Share

Raj Thackeray | “भाजपने ‘ती’ निवडणूक लढवू नये…”, राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना कोड्यात आणणारं पत्र

Raj Thackeray | मुंबई : आमदार रेश लटके यांच्या मृत्यूनंतर अंधेरी पूर्वमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट देखील ही निवडणूक लढत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी केलेल्या विनंतीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाणा आलं आहे.

राज ठाकरे यांचं पत्र –

यादरम्यान, आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल, असं राज ठाकरेंनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

पाहा पत्र –

माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल, असं देखील ठाकरेंनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर –

दरम्यान, राज ठाकरे यांच्या पत्रावर उत्तर देत असताना अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देऊ नका आणि तिथे दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या विजयी होतील, असे पाहा’ अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यावर, ‘राज यांचे म्हणणे रास्त असले तरी आमच्या पक्षात मी एकटाच निर्णय घेत नाही. त्यामुळे मला पक्षातील सहकाऱ्यांशी तसेच वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजप काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Raj Thackeray | मुंबई : आमदार रेश लटके यांच्या मृत्यूनंतर अंधेरी पूर्वमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी रमेश लटके यांच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now