जमिनीवर ठाण मांडत राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद

नाशिक : विधानसभा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सपाटून मार खाल्ल्यानंतर आता राज ठाकरे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कमालीच्या वेगाने कामाला लागले आहेत.

कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नाकारीकांशी संवाद साधण्याच काम राज ठाकरे यांनी सुरु केलं आहे. सध्या नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी थेट जमिनीवरच ठाण मांडले. राज ठाकरेंचा हा पवित्रा पाहून मनसे कार्यकर्त्यांत कमालीचा जोश संचारला आहे.

पक्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी मनसे अध्यक्षांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी जमिनीवर बसून संवाद साधला.