बदलत्या सत्ता समीकरणांवर राज ठाकरे घेणार महत्त्वाची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात गेल्या शिवसेना-भाजपा यांच्यातील युती तुटून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले . त्यानंतर आता मनसे सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी हि बैठक होणार असल्याची माहिती समोर आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षासाठी पक्षाला मतदान करावं, असं आवाहन केलं होतं. मात्र युती आणि आघाडीच्या तुलनेत स्बबळावर लढणाऱ्या मनसेला राज्यात केवळ १ जागा मिळाली. जिंकता आली. मनसेने या निवडणुकीत १०० च्या आसपास उमेदवार उभे केले होते. त्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील आमदार म्हणून निवडून आले.

Loading...

दरम्यान विधानसभेत मनसे आघाडीसोबत सहभागी होणार असल्याचा चर्चा सुरु असतानाच मनसेने आघाडीसोबत न जाता स्वबळावर निवडणुका लढविल्या. मात्र काही ठिकाणी आघाडीकडून मनसेच्या उमेदवाराला पाठींबा दिला जात होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सर्व सत्ता समीकरणे बदलली. सरकारच्या बहुमत चाचणी वेळीही मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती चर्चा होण्याची शक्यता आहे.

मनसेचा एकमेव आमदार राज्यात निवडून आला असला तरी मुंबई, ठाणे पट्ट्यात काही जागांवर मनसेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत. विक्रोळी, मुलुंड, मागाठणे, भिवंडी ग्रामीण, दादर-माहिम, ठाणे, शिवडी, डोंबिवली आणि कोथरुड या मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमाकांची मते मिळाली होती.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर