लोडशेडिंगबाबत राज ठाकरेंच्या फेसबुक पेजवरून जनहितार्थ सूचना

टीम महाराष्ट्र देशा – अवघ्या काही वेळात राज ठाकरेंची तोफ ठाण्यात धडाडणार असून त्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फेसबुकवर लोडशेडिंग संदर्भात करण्यातआलेली पोस्ट चांगल्याच चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्ट मध्ये राज ठाकरे यांच्या भाषणावेळी महाराष्ट्रातील बहुतांश भागातील बत्ती गुल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.एलफिस्टन दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी एक विशाल मोर्चा काढला होता त्यानंतर राज ठाकरे यांच्या भाषणाच्यावेळी राज्याच्या बहुतांश भागातून बत्ती गुल झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या आता आज काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र इंच इंच विकला जातोय… यावर लक्ष्यभेदी ‘राज’सभा !!!
महाराष्ट्र इंच इंच विकला जातोय… यावर लक्ष्यभेदी ‘राज’सभा !!!