मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेलेल्या राज ठाकरेंच्या पदरी निराशा

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ईव्हीएम मशीन संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीन बाबत आपली भूमिका मांडली. मात्र राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांची घेतलेली भेट ही फारशी सकारात्मक झाली नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरे हे नाराज आहेत.

याबाबत राज ठाकरे म्हणाले की, जनतेचा प्रतिनिधी म्हणून ईव्हीएमविरोधात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. एका आठवड्यात या प्रकरणाचा निकाल लागेल. तसेच घोडेबाजार किती दिवस चालणार? मॅचफिक्स असेल, तर सामने खेळून काय फायदा? पत्रकारच म्हणत आहेत, की भाजप हा घोडेबाजार करत आहेत; मग असेल!, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर आणि निकाल लागण्या आधीही काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनबाबत शंका व्यक्त केली होती. तसेच अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगच्या विश्वासर्हतेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.