अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?

raj thackeray

मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती भयंकर असल्याने गेल्या २ महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. तसेच विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या बाबत सुरु असलेल्या गोंधळाविषयी राज्यात अनेक चर्चा सुरु आहे. आता याचाच धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात राज ठाकरे म्हणतात, ‘मुंबई आणि पुण्याची परिस्थिती पाहता आणखी किती काळ लॉकडाऊन राहील याचं भाकीत कोणीच करु शकत नाही. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

तसेच ‘परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट विद्यार्थ्यांना पास करणे असं होत नाही. आधीच्या सेमिस्टर्स आणि महाविद्यालयांनी घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारावर किंवा काही प्रोजेक्ट्स देऊन अथवा इतर अनेक पद्धतीने विद्यार्थ्यांचा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करता येईल, असंही राज ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात आणि यात कुठल्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढेल – राऊत

#covid_19 : आतापर्यंत राज्यात 15 हजार 786 जणांनी केली ‘कोरोना’वर मात

केंद्राच्या पॅकेजला ‘आत्मनिर्भर’ हे केवळ गोंडस नाव, यातून दिलासा मिळणे अशक्य : चव्हाण

‘रिकाम्या खोक्यात भाजपची रिकामी डोकी भरून गुजरातच्या अंधार कोठड्या पाहायला पाठवायला हवे’