fbpx

राज ठाकरे यांची व्यंगचित्रे अनेक सभांपेक्षा परिणामकारक असतात – भुजबळ

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची व्यंगचित्रे ही अनेक सभांपेक्षा परिणामकारक असतात. पंतप्रधान मोदींवर राज ठाकरे तीव्र शब्दात प्रहार करीत आहेत. त्यांची व्यंगचित्रे सुद्धा टोकदार असतात. सभांच्या माध्यमातून जितका परिणाम होत नाही तो राजच्या एकाच व्यंगचित्रांतून होतो. अमरावती येथील परिवतर्तन यात्रेत सहभाग घेऊन परत आल्यानंतर भुजबळ पत्रकारांशी बोलत होते.

त्यासोबतच मनसे आघाडीत राहणार आहे, परंतु निवडणूकीच्या मैदानात मात्र नाही, असे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नागपुरात दिले आहेत.

“त्यामुळे मोदीविरोधक म्हणून राज ठाकरे ओळखले जातात. ते आघाडीत सामील होणार म्हणजे लोकसभा निवडणूक लढविणारच असे नाही. निवडणूक न लढविताही काही जण आघाडीत राहू शकतात, असे सांगत भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल आघाडीला आपुलकी असल्याचे स्पष्ट केले आहे.

1 Comment

Click here to post a comment