fbpx

राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजप समर्थकाचे प्रत्युत्तर

टीम महारष्ट्र देशा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवला होता. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रजासत्ताक’ फासावर लटकवल्याच व्यंगचित्र रेखाटल होत. यानंतर एका भाजप समर्थकाने व्यंगचित्रातून राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. सध्या हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.

या व्यंगचित्रात लोकशाहीऐवजी राज ठाकरेंना फासावर लटकवत असल्याचे दाखवण्यात आलं असून ‘अच्छे दिन न बघवीते’ अशी टीका राज ठाकरेंवर केली आहे.

राज  ठाकरे  यांनी व्यंगचित्रामध्ये भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीची गळचेपी होत असल्याचे दाखवले. अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर दाखवले आहेत.तर ते दोघे लोकशाहीला फासावर लटकवत असल्याच चित्र रेखाटल आहे.
राज ठाकरे यांची व्यंगचित्र ही नेहमीच वेगळी व सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी असतात. त्यामुळे राज ठाकरे यांच हे व्यंगचित्र भाजप समर्थकांना चांगलच जिव्हारी लागल आहे.