fbpx

सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढता पाय घेतला असला तरी राज ठाकरे राज्यातल्या प्रमुख मतदार संघांमध्ये जावून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत न उतरता भाजप विरोधात प्रचार करणार असल्याचे ठरवले आहे.

राज ठाकरे यांची लोकसभा निवडणूक प्रचारासाठीची पुण्यातील एकमेव सभा पुढील आठवड्यात गुरुवारी (१८ एप्रिल) होणार आहे. १८ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता सिंहगड रस्त्यावरील गोयल गंगा मैदानावर ही सभा होणार आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सीमेवर राज ठाकरे या सभेतून मोदी-शहांना कसे लक्ष्य करणार याकडे लक्ष लागले आहे.

महायुतीकडून बारामती लोकसभा मतदार संघातून कांचन कुल यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. सिंहगड रस्त्याचा काही भाग पुणे, तर बहुतांश भाग सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात येतो त्यामुळे राज यांच्या सभेचा सुप्रिया सुळे यांना फायदा होईल का हे निकालानंतरचं समजेल.

दरम्यान, यापूर्वी झालेल्या सभांमधून त्यांनी मोदी सरकारविरुद्ध जोरदार टीका केलेली आहे. त्यामुळे या सभेचा फटका कांचन कुल यांना बसण्याची शक्यता आहे.