मराठी उद्योजकांना आक्रमक होण्याचे राज ठाकरेंचे आवाहन

raj-thackeray

मुंबई: मराठी उद्योजकांनी आक्रमक व्हावे, जे काही कराल ते राज्यासाठी करा ! भारतातील प्रत्येक राज्य हा एक देश आहे. असे महाराष्ट्र बिजनेस क्लबमध्ये मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र ही भुमी आपण समज़ुन घेतली पाहीजे. बाहेरून लोक आले ते व्यवसाय करत बसले आपले लोक नोकरी करत बसले. महाराष्ट्रात सर्व सोयीसुविधा असल्याने बाहेरून लोक व्यवसायासाठी आले.

बाहेरील लोकांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. महाराष्ट्रातील शहरांचे महत्व दुर्दैवाने मराठी लोकांना समजत नाही. शहरांमध्ये मराठी लोकसंख्या कमी होत आहे आणि बाहेरील लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मराठी माणसाला व्यवसायात आक्रमक व्हावे लागेल!

महाबळेश्वर मध्ये ६०ते ७० % लोक हे गुजराती जातात. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना जर वाटत असेल की आपल्या राज्याचा विकास व्हवा त्यांच्या सतत मनात तेच असतं. सर्व गोष्टी गुजरात मध्येच. बुलेट ट्रेन गुजरात मध्येच का ? दुसरीकडे का नाही ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

ठाणे जिल्ह्यात ७-८ महानगरपालिका आहेत ठाण्यात लोकसंख्या वाढत आहे. ही शहरं जर मराठी माणसाच्या हातातून गेली तर तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्थळांवर स्वःताचा ठसा उमठवा.  असे आवाहन राज ठाकरे यांनी उद्योजकांना केले.