Karnataka Election; भाजपने सत्तेचा दुरुपयोग करू नये, राज ठाकरेंचा सल्ला

raj thakare vr narendra modi

टीम महाराष्ट्र देशा- राज ठाकरे यांनी कर्नाटकमधील परिस्थितीवर भाष्य करताना, कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपाच्याच बाजूने जाणार, पण सत्ता आहे म्हणून भाजपाने दुरुपयोग करु नये अशी असा सल्ला दिला आहे. भाजपाची सुद्धा वेळ येणार आहे, सत्ता गेल्यावर त्यांचीही चौकशी होणार असंही ते बोलले आहेत.

राज ठाकरे यांच्याप्रमाणेच जेडीएस चे नेते कुमारस्वामी यांनी भाजपवर शरसंधान केलं आहे. भाजपने आमचे १० आमदार फोडले तर आम्ही त्यांचे २० आमदार फोडू असा थेट इशारा कुमारस्वामी यांनी भाजपला दिला आहे. भाजप सत्तेसाठी हपापलेली असून भाजप जेडीएस ला संपवायला निघाली होती त्यामुळे त्यांसोबत जाण्याचा प्रश्नच नाही असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. भाजपने धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फुट पाडल्याचा देखील आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

थोड्यावेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कुमारस्वामी यांनी भाजपवर निशाना साधला आहे. पाठींबा दिल्याबद्दल कॉंग्रेसचे आभार देखील कुमारस्वामी यांनी मानले. तर कुमारस्वामी यांचे भाऊ रेवण्णा यांनी भाजपने १०० कोटी रुपयांची ऑफर दिली तसेच केंद्रात मंत्रिमंडळात स्थान आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याचं आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे.