राज ठाकरे यांचा आज ५३वा वाढदिवस ; ‘या’ ठिकाणी मिळतंय ५३ रुपयांत एक लिटर पेट्रोल

raj thackrey

नाशिक : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५३वा वाढदिवस आहे. राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचं वातावरण असतं. दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी येत असतात. परंतु मागील वर्षभरापासून देशावर तसेच राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशास्थितीत गर्दी होऊ नये ही जबाबदारी ओळखून राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिले होते.

राज ठाकरेंनी या पत्रातून वाढदिवसाला घरी न येता जिथे आहात तिथून पूर्ण काळजी घेऊन कामात राहा, समाजोपयोगी काम करा. त्याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्वीकारेन असं त्यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीनं आज राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त 53 रुपयांत 1 लिटर पेट्रोल देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. नाशिक शहरात काही ठिकाणी ही सवलत दिली जात आहे.

दरम्यान नाशिक शहरात आज पेट्रोलचा दर 103 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 93 रुपये 65 पैसे आहे. त्यामुळे इंधन भरण्यासाठी वाहनचलकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. देशात इंधनाच्या दरानं शंभरी गाठल्यानंतर अनेकांनी सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल डिझेलचे दर आवाक्यात आणण्यासाठी सर्व स्तरातून मागणी केली जात आहे. मात्र, सरकार सामान्य नागरिकांच्या या मागणीकडे कानाडोळा करताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP