राज ठाकरे घेणार पूरग्रस्तांची भेट; लागेल ती मदत करण्याची दाखवली तयारी

raj thakare

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. या पूरग्रस्तांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी फोनवरुन पुरग्रस्तांची विचारपूस केली आणि पिडितांना धीर दिला. तसेच लवकरात लवकर मी तुम्हाला भेटायला येतो असं आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी तयार आहे. पूरग्रस्त बाधित गावांना जी मदत लागेल ती मदत आम्ही करू असंही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वीही राज ठाकरे यांनी ‘सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक न घेता ती पुढे ढकला, आणि कोल्हापूर, सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करा अशी मागणी केली होती. आणि आता ते स्वतः या भागाचा दौरा करणार आहेत.

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सांगली आणि कोल्हापूरमधली पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाऊन मला जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती. त्यामुळे मी या भागाचा दौरा केला नाही असं विधान केले. तसेच पूरग्रस्तांसाठी शिवसेनेचे काम सुरु आहे असंही उद्धव ठाकरे म्हटले आहे.