Breaking : राज ठाकरे मराठवाडा दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतणार

राज ठाकरे

औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांचा मराठवाडा दौरा अर्धवट सोडणार आहेत. राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा तीन दिवसांचा होता. मात्र ते उद्या सकाळीच मुंबईत परतणार आहेत. राज यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

राज ठाकरे काल संध्याकाळी औरंगाबादला पोहोचले. ते १६ फेब्रुवारीला मुंबईला परतणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांचे कार्यक्रम ठरलेले होते. मात्र आता राज यांनी मराठवाडा दौरा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे उद्या सकाळी मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे त्यांचे उद्याचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज ठाकरे उद्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार होते. ते शिक्षकांच्या संमेलनादेखील उपस्थित राहणार होते. याशिवाय काही हिंदुत्ववादी संघटना आणि प्रतिष्ठीत व्यक्तींनादेखील भेटणार होते.

Loading...

राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मानस बोलून दाखवला आहे.

औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता? तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का? त्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन