मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून जवळीक निर्माण झाल्याच दिसत आहे. याच चित्र आज पहायला मिळत आहे, सकाळीच राज ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील पेडर रोडवर असणाऱ्या पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले .

राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट का? घेतली हे मात्र गुलदस्त्यातच आहे. दरम्यान उद्या गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का?, याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत

फेब्रुवारी महिन्यात राज ठाकरे यांनी शरद पवार यांची महामुलाखत घेतली होती . तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलताना दिसत आहेत. आज अचानक राज हे पवारांच्या भेटीला गेल्याने पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.