fbpx

राज ठाकरे यांची ‘फेसबुक’वर एन्ट्री

मुंबई : गेली अनेक दिवस सोशल मिडियासह राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे याचं फेसबुक पेज आज लाँच करण्यात आल आहे. रविंद्र नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात हे फेसबुक पेज लाँच करण्यात आल. राज यांची फेसबुकवर एन्ट्री होताच ते ट्विटर ट्रेंड्समध्ये देखील आघाडीवर आहेत. राज याचं हे पेज व्हेरीफाईड करण्यात आल असून लाखो लोकांनी त्याला लाईक देखील केल आहे. आपली व्यंगचित्र पक्षाची काम आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी या फेसबुक पेजचा वापर केला जाणार असल्याच यावेळी राज ठाकरे यांनी बोलताना सांगितल आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले कि, वर्तमानपत्र किंव्हा साप्ताहिक काढायच माझ्या मनात होतं. पण आजकाल ते चालवणं मोठं अवघड झाल आहे. त्यामुळे फेसबुकवर यावं असं वाटल्याने आज फेसबुक पेज लाँच करतोय, फेसबुक पेज सुरु केल्याने नागरिकांशी मला थेट संवाद साधता येईल आणि तेही माझ्याशी संवाद साधू शकतील.

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

दक्षिणेकडील प्रत्येक राज्य त्यांच्या भाषेसाठी आग्रही : राज ठाकरे

भाजपचा सध्याचा डोलारा हा उलटा पिरॅमिड आहे : राज ठाकरे

भाजपमध्ये काम करणारे मराठी नेते हुजरे, त्यांना कशाचंही देणंघेणं नाही : राज ठाकरे

मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्रभर धिंगाणा घालेन : राज ठाकरे

मुंबई गुजरातला जोडण्याच्या जुन्या स्वप्नासाठी बुलेट ट्रेनचा घाट : राज ठाकरे

भाजपने फुटबॉल वाटले आणि काँग्रेसने सिंधुदुर्गात लाथ मारली, आता दोन्ही गोली म्हणतात तो बॉल माझ्याकडे नको : राज ठाकरे

मनसेचा व्हॉट्सॲप क्रमांक : 7666662673 फेसबुक पेजवरचे अपडेट या क्रमांकावर मिळतील – राज ठाकरे

बुलेट ट्रेनपेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या’ मराठी माणसाला नख लावलात तर धिंगाणा घालू – राज ठाकरे

दाऊदला स्वत:च भारतात यायचंय – राज ठाकरे ‘दाऊदला आणल्याचं श्रेय भाजप निवडणुकीत घेणार’ – राज ठाकरे

‘2 वर्षांत 30 हजार विहिरी खोदल्याची मुख्यमंत्र्यांची थाप’ आम्हाला थापा मारणारं सरकार नको – राज ठाकरे

मराठी भाषेबाबत आपण आग्रही का नाही? – राज ठाकरे आपण आपल्या राज्याचा विचार का करत नाही? – राज ठाकरे