Raj Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली. यावेळी मुलाखतीच्या शेवटी सुबोध भावेंनी अतिशय रोमांचक असता सवाल राज ठाकरेंना केला. छपत्रती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एखाद्यी गोष्ट सांगायची असेल तर तुम्ही काय सांगला?, असा सवाल सुबोध भावे यांनी केला. यावर उत्तर देताना जर महाराष्ट्राची सत्तेत आपल्या हातात आली तर काय करणार याबाबत राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
राज ठाकरे यांनी शपथ घेऊन सांगितला नवीन महाराष्ट्र –
माझ्या पक्ष स्थापनेच्या वेळेला पहिल्या सभेलामध्ये जे मी बोललो तेच मी महाराजांना स्मरण करून खरंच शपथपूर्वक सांगतो असं म्हणत जर हे राज्य माझ्या हातात आलं तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखवीन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात परिवर्तन घडवनं सहज शक्य आहे, आज नाहीतर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर कधी ना कधी हे नक्की घडेल, असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट आत टाकणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात अशक्य असं काही नाही, असं देखील राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, अलिकडे राज ठाकरे चर्चेत येत आहे. पहिलं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. तर या भेटीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधेरी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्र लिहिलं आहे. यामध्ये भाजपने अंधेरी पूर्वची निवडणुक लढू नये अशी मागणी करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना पत्र –
यादरम्यान, आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल, असं राज ठाकरेंनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल, असं देखील ठाकरेंनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MNS | आरं ‘विंद’ सावंतांच्या थोबाडीत चपराक; पवारांच्या वक्तव्यानंतर मनसेचा टोला
- Sandipan Bhumare | संदीपान भुमरे यांची शस्त्रक्रिया सुरु असतानाच लाईट गेली अन्… ; सरकारी रुग्णालयात गोंधळ
- Raj Thackeray | “भाजपने ‘ती’ निवडणूक लढवू नये…”, राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना कोड्यात आणणारं पत्र
- Raj Thackeray | राज ठाकरेंचा दिलदारपणा; वांजळेंच्या निधनानंतर हक्काची जागा सोडली होती राष्ट्रवादीला
- Andheri By Election । अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार?, शिंदे गटातील आमदारच मुख्यमंत्र्यांना पत्र