Share

Raj Thackeray | राज ठाकरे काढणार शिवरायांवर चित्रपट, घोषणेच्या वेळी म्हणाले…

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज अख्या राज्याचेच नव्हे तर देशाचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या इतिहासावर आधारित आजवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये लवकरच महेश मांजरेकर यांचा देखील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावरून सध्या बराच वाद निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आता शिवरायांच्या जीवनावर आजवरचा सर्वात मोठा चित्रपट काढणार असल्याचे सांगितले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका मुलाखतीमध्ये म्हणाले आहे की,”एका दगडांवर पाय ठेवून चालने सध्या तरी शक्य नाही. तर, राजकारण आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी खूप मोठ्या आहेत. आपल्या देशामध्ये निवडणुका हा एक धंदा होत चालला आहे. निवडणुका कधीच संपत नसल्याने चित्रपट निर्मितीला वेळ देता नाही. कॉलेजमध्ये असताना गांधी चित्रपट पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांवर देखील एवढा मोठा चित्रपट पाहिजे असं वाटायचं. सध्या माझं त्याच्यावर काम सुरू आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होईल.” असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

राजकारणात जरी मी अपघाताने आलो असलो तरी चित्रपट निर्मिती ही माझी पहिली आवड आहे. त्यामुळे कोणताही चित्रपट मी त्याच दृष्टीने पाहतो. यामध्ये अनेक चित्रपट खूप घाईगडबडीने बनवले जात असल्याचं जाणवत आहे. अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

हर हर महादेव या चित्रपटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेला आहे. तर वेडात मराठे वीर दौडले या चित्रपटाला सुद्धा त्यांचा पूर्ण पाठिंबा असून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी राज ठाकरे यांनी सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज अख्या राज्याचेच नव्हे तर देशाचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या इतिहासावर …

पुढे वाचा

Entertainment Politics

Join WhatsApp

Join Now