ठाकरी फटकाऱ्यांची ‘राज’गर्जना आता फेसबुकवर

मुंबई : मागील लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरं जावं लागलं. आता हा शेवटचा पराभव असं सांगत राज ठाकरे यांनी पक्षाच्या मोर्चेबांधणीला नव्याने सुरुवात केलीये.

आता राज ठाकरे स्वत: फेसबुक पेजवर एंट्री घेत आहेत. घसरलेल्या इंजिनला ट्रॅकवर आणण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अखेर कामाला लागले आहे. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे आता फेसबुक पेज सुरू करणार आहे.

येत्या २१ सप्टेंबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतःच फेसबुक पेज लाँच करणार आहेत. मुंबईतील दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर इथं सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास फेसबुक पेज लाँचिंगचा सोहळा होणार आहे.

 

You might also like
Comments
Loading...