राज ठाकरेंचा पुन्हा नाशिक काबीज करण्याचा इरादा

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि नाशिकचे अनोखे नाते आहे. त्यामुळेच नाशिककरांनीही यापूर्वी मनसेच्या इंजिनाला गती देत तीन आमदार विधानसभेत पाठविले. तसेच महापालिकेवरही मनसेचा झेंडा फडकविला. परंतु गत विधानसभा व महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी मनसेला नाकारले. ठाकरे यांनी नाशिकच्या विकासाकडे मात्र सातत्याने लक्ष पुरविले आहे. आता पुन्हा नाशिक काबीज करण्यासाठी राज ठाकरे पुढे सरसावले आहेत.
उद्या मंगळवार (दि. १८) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून ते २२ डिसेंबरपर्यंत शहरासह जिल्ह्यात दौरा करणार आहेत. अलिकडे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपविरोधात आलेले निकाल आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात ठाकरे जिल्हा पिंजून काढणार आहेत.
You might also like
Comments
Loading...