राज ठाकरेंना न्यायालयात लावावी लागणार हजेरी !

टीम महाराष्ट्र देशा : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक विधानांमुळे कार्यकर्त्यांनी दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

राज ठाकरे यांनी या प्रकरणी न्यायालयात हजर राहण्यापासून माफी मिळावी. यासाठी औरंगाबाद जिल्हा न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज केला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी हा अर्ज मंगळवारी फेटाळला. त्यामुळे ठाकरेंना न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

काय आहे प्रकरण ?

राज ठाकरे यांना २००८ मध्ये अटक करण्याचे आदेश निघाले होते. त्यानंतर ‘हिमंत असेल तर अटक करून दाखवा, मग बघा!’ असे विधान त्यांनी केले होते. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी पिशोर ते भारंबा जाणाऱ्या एसटीवर दगडफेक केली. ही घटना २१ ऑक्टोबर २००८ रोजी घडली. या घटनेनंतर सात जणांवर पेशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळे खटला प्रलंबित आहे.

Shivjal