राज ठाकरेंच्या भाषणातील ‘या’ दहा प्रश्नांची उत्तरे मोदी – फडणवीस देतील का ?

raj thackeray at nanded

नांदेड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पुन्हा एकदा तोफ डागली आहे, मुंबईतील मेळाव्यानंतर नांदेडमध्ये सभा घेत राज यांनी भाजपचे वाभाडे काढले आहेत. देशाने मोदींच्या हातात संपूर्ण बहुमताचं सरकार दिलं, पण त्यांनी नोटबंदी आणली, आधी एफडीआयला विरोध केला आता एफडीआय आणलं, जीएसटीला विरोध केला आणि आता जीएसटी आणून छोट्या व्यापारांच कंबरडं मोडल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे.

लोकसभ निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार न देता राजठाकरे यांनी मोदी आणि भाजप विरोधात राज्यभरात सभा घेणार असल्याचं जाहीर केल आहे, शुक्रवारी नांदेडमध्ये सभा घेत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी मराठवाड्यातील दुष्काळ ते सैनिकांच्या बलिदानापर्यंत नरेंद्र मोदी यांच्याकडून राजकारण केल जात असल्याचा आरोप राज यांनी केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न केले आहेत.

१. एका सभेत मोदी म्हणतात माझ्या जीवाला धोका आहे, तर दुसरीकडे म्हणाले देश माझ्या हातात सुरक्षित आहेएकदा म्हणता माझ्या जीवाला धोका आहे आणि दुसरीकडे म्हणतात देश सुरक्षित आहे, नक्की काय खरं आहे?

२.महाराष्ट्रात २४ हजार गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत, मग तुम्ही पाण्यावर काय काम केलं?

Loading...

३. बीडमध्ये महिलांचं गर्भाशयं विकली जात आहेत, चौकीदार करतो काय?

४. महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडतोय आणि दुसऱ्या मार्गाने गुजरातला वळवत आहेत. ह्यावर देवेंद्र फडणवीस काहीच का बोलत नाहीत ?

Loading...

५. पण मोदी म्हणाले की भगतसिंगांना जेल मध्ये असताना नेहरू परिवारातील कोणी भेटायला का गेले नाही? ह्या गोष्टीचा निवडणुकांशी काय संबंध? रोजच्या जगण्याशी ह्याचा काय संबंध?

Loading...

६. मोदी फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधींबद्दल बोलत आहेत, तुमच्या कामाबद्दल कधी बोलणार, बेरोजगार तरुणांबद्दल कधी बोलणार? महिला सुरक्षेबद्दल कधी बोलणार? शेतकरी आत्महत्येबद्दल कधी बोलणार?

७. मोदी हे २०१४ मध्ये देशाला दाखवलेल्या स्वप्नांच्या जीवावर मतं का मागत नाही ? शहीद जवानांच्या नावावर का मत मागतात ?

८. बालाकोट हवाई हल्ल्यात शत्रू राष्ट्राचे किती सैनिक मारले गेले ह्याचा आकडा हवाई दलाच्या प्रमुखांकडे नाही, पण अमित शाह म्हणाले २५० माणसं मारली गेली. त्यांना हा हा आकडा कुठून मिळाला ?

९. देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाराष्ट्रात एक लाख वीस हजार विहिरी खणल्या. कुठे आहेत ह्या विहिरी?

१० नरेंद्र मोदींच्या सभेत कोणी काळा शर्ट घालून आला तरी बाहेर काढत आहेत. पंतप्रधान काळ्या रंगाला का घाबरतात ?