आधीचे नालायक म्हणून वाचमन बदलले! पण हेही झोपाच काढतायत

बँकबुडव्या मल्या-मोदीवरून राज ठाकरेंचे फटकारे

हिरे व्यापारी नीरव मोदीचा पी एन बी घोटाळा समोर येताच देशभरात मोठी खळबळ उडाली. त्यातच मोदीने विजय मल्याप्रमाणे देशातून पळ काढला आहे. या प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ३६० कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.

हे सर्व घडत असताना भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत. दरम्यान, याच प्रकारणार भाष्य करत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना टार्गेट करत एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.

राज यांच्या व्यंगचित्रात ‘बँक ऑफ विश्वास दाखवण्यात आली असून मल्ल्या आणि मोदीसारखे बँकबुडवे त्यातील पैसे घेवून पळून जात आहेत. तर बाजूला वाचमन असणारे नरेंद्र मोदी आणि जेटली गाढ झोपले आहेत.