हँड्स अप ! निकाल पैसा… पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राज ठाकरेंचे मोदी-शहांना फटकारे

raj cartoon

टीम महाराष्ट्र देशा : जगात तेलाच्या किंमती खाली घसरल्या असताना सुद्धा भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे अशा स्वरूपाच्या बातमीचा हवाला देऊन मनसेप्रमुख राज ठाकरेंनी बाबांनो हेच ते अच्छे दिन ! या शीर्षकाखाली व्यंगचित्र काढून मोदी – शहांना चांगलेच फटकारले आहे.

राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रामध्ये पंतप्रधान मोदी सर्वसामान्य लोकांच्या कारमध्ये पेट्रोल भरताना तर अमित शहा त्यांच्या शेजारी पैसे घ्यायला थांबल्याचे दाखवले आहे. हॅंडस अप निकाल पैसा असाही उल्लेख राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रात केला आहे. याआधीच्या व्यंगचित्रामध्ये देखील राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांना लक्ष्य केले होते.