कॉंग्रेसने भाजपच्या घशातून सत्ता ओढून काढली; राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून निशाणा

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हत. मात्र भाजप १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यांना बहुमतासाठी आणखी ८ जागांची आवश्यकता होती. तर दुसरीकडे कॉंग्रेसने जेडीएसला पाठींबा देत राज्यपालांकडे सत्ता स्थापण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी कॉंग्रेस एवजी भाजपला सत्ता स्थापण्यासाठी बोलावल्याने कॉंग्रेसने या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भाजपला बहुमत सिद्ध न करता आल्याने भाजपने सत्ता गमावली.

दरम्यान सत्ता मिळूनही केवळ अडीच दिवसातच भाजपला सत्ता गमवावी लागल्याने राज ठकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजप आणि अमित शहा यांच्यावर निशाना साधलाय. भाजपच्या घशातून कॉंग्रेसने सत्ता ओढून काढल्याची टीका राज ठाकरे यांनी केलीये. राज ठाकरे याचं हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय.