राज ठाकरेंनी उडवली नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची खिल्ली

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेहमीप्रामाणे आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस चॅलेंजचीही खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहेत. मनसे अध्यक्ष त्यांच्यावर सतत टीका करत असतात.

राज ठाकरेंनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात एक झाड रेखाटले आहे, त्या झाडाला ‘महाराष्ट्र’ असे नाव दिले असून त्या झाडाला वेलींनी घेरले आहे. या वेलींवर ‘जातीपातीचे विष’ असे लिहिले आहे. तसेच झाडाच्या बाजूला देवेंद्र फडणवीस उभे आहेत.आणि त्यांच्या बाजूला असेलेला ‘मराठी’ माणूस मुख्यमंत्र्यांना झाडाच्या विषारी वेली छाटण्याची विनंती करत आहे.

तसेच पंतप्रधान मोदी एका दगडावर झोपले आहेत, बाजूला एकजण रडताना दिसतो. त्याची पत्नी त्याला म्हणते, “उठाsss!!! असे रडत काय बसलात लहान पोरासारखे! अहो, ते व्यायाम करतायत!”

शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी व्हावी – राज ठाकरे

राज ठाकरे जेंव्हा वडापाव वर ताव मारत कार्यकर्त्यांशी सवांद साधतात