शरद पवारांच्या भेटीवर राज ठाकरे म्हणतात ‘ही तर सदिच्छा भेट’

राज ठाकरे यांनी आज सकाळी मुंबईतील पेडर रोड येथील शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरेंनी अचानक पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आले होते. मात्र ‘पुण्यामधील मुलाखतीनंतर शरद पवार यांची भेट झाली नव्हती, त्यामुळे आज सदिच्छा भेट दिल्याच’ राज ठाकरे यांनी म्हंटल आहे. तसेच आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून जवळीक निर्माण झाल्याच दिसत आहे. याच चित्र आज पहायला मिळत आहे, सकाळीच राज ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील पेडर रोडवर असणाऱ्या पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले .

राज ठाकरेंच्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या. मात्र आता खुद्द राज यांनीच ही भेट केवळ सदिच्छा असल्याच सांगितले आहे. मात्र तरीही या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीने मोठी खळबळ उडवून दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात राज ठाकरे यांनी शरद पवार यांची महामुलाखत घेतली होती . तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलताना दिसत आहेत. आज अचानक राज हे पवारांच्या भेटीला गेल्याने पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

You might also like
Comments
Loading...