… म्हणून अंबानीने दिला कॉंग्रेसला पाठींबा : राज ठाकरे

raj thackeray at nanded

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे मनसेच्या व्यासपिठावरून भाजपला मतदान करू नका असे आवाहन जनतेला करत आहेत. तर मंगळवारी झालेल्या मुंबईतील काळाचौकी येथील सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही, याचा अंदाज आल्याने उद्धव ठाकरे यांचे मित्र मुकेश अंबानींनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे ठामपणे सांगितले.

यावेळी राज म्हणाले की, देशाच्या इतिहासात कोणत्याही उद्योगपतीने निवडणुकीत राजकीय पक्षाला पाठिंबा दिल्याची घटना घडली नाही. मुकेश अंबानी यांना काँग्रेसला पाठिंबाच द्यायचा होता तर त्यांनी गुपचूप मतदान केले असते. मात्र त्यांनी जाहीरपणे मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला. त्यांच्या भूमिकेचे उद्योगपती उदय कोटक यांनीही स्वागत केले. यावरून हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, हे लक्षात आल्यानेच त्यांनी मोदी यांच्याकडे पाठ फिरवली आहे.

तसेच या सभेत राज यांनी मोदी यांच्या शरद पवारांच्या बाबतच्या वक्तव्यांचे ऑडीओ – व्हिज्युअल स्क्रीन वर दाखवून मोदींच्या दुट्टपीपणाचे दर्शन उपस्थितांना घडवून आणले. तर या सभेत प्रथमच राज यांनीशिवसेनेवर देखील भाष्य केले. यावेळी राज म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन माणसं या देशासमोरील सर्वात मोठ संकट आहेत. त्यामुळे या दोन माणसांना निवडून देऊ नका असे आवाहन त्यांनी जनतेला केले. तर शिवसेनेलाही मतदान करू नका असे राज ठाकरे म्हणाले.Loading…
Loading...