राज ठाकरे पॅटर्न: सोशल मिडीयावर एकच चर्चा ‘लाव रे व्हिडीओ’

raj thackeray speech style

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची स्टाईल युवकांमध्ये प्रसिद्ध आहे, सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये एकही उमेदवार न देता ते मोदी – शहा यांच्या जोडीवर निशाणा साधत आहेत. गुढीपाडवा मेळावा, नांदेडची सभा आणि आता सोमवारी सोलापूरच्या सभेत राज यांनी भाजप सरकारची पोलखोल केली आहे.

blank

या सर्व सभांमध्ये स्टेजच्या बाजूला मोठे स्क्रीन लावत राज ठाकरे व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना सरकारच्या गोष्ठी समजावून सांगत आहेत. आपल्या खास ठाकरी शैलीत ‘लाव रे टो व्हिडीओ’ चा आवाज होताच स्क्रीनवर भाजपच्या कामांची चिरफाड केली जात आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडीयावर ‘लाव रे टो व्हिडीओ’ने धुमाकूळ घातला आहे.

blank

राज ठाकरे यांनी मुंबईच्या सभेत ‘लाव रे टो व्हिडीओ’ म्हणताच सरकारकडून अमरावती जिल्ह्यातील हरिसाल गावामध्ये केलेला विकास उघडा पडला, तसेच भाजपने एका सामन्य युवकाला ‘मी लाभार्थी’ कसे बनवले हे देखील त्यांनी दाखवून दिले.

blank

नांदेडमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यामध्ये १ लाख वीस हजार विहिरी बांधल्याचा दाव्याची खिल्ली उडवली होती, मराठवाड्यात दुष्काळाचे भीषण असताना मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा असल्याची टीका त्यांनी केली होती.

‘लाव रे व्हिडीओ’ सोशल मिडीयावर ट्रेंडीगला