राज ठाकरेंनी बिंग फोडले, जाणून घ्या काय घडलं ‘त्या’ दिवशी मातोश्रीवर

टीम महाराष्ट्र देशा- भाजपा अध्यक्ष अमित शहांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर घेतलेल्या भेटीची चर्चा दोन दिवसानंतरही राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीनंतर शिवसेना आणि भाजपा पुढील लोकसभा निवडणुकीत एकत्र लढणार, अशी शक्यता काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत असताना शिवसेनेचे नेते मात्र स्वबळावर ठाम आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या भेटीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून निशाणा साधला.

राज ठाकरे यांनी ‘भेट आणि मन की बात’ या आशयाखाली हे व्यंगचित्र रेखाटले आहे. राज यांनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर निशाणा साधलाय.राज यांनी आपल्या याव्यंगचित्रात अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची गळाभेट दाखवली. पण दोन्ही नेते एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत असल्याचं दाखवलंय.