देश चालवायला मला थोडे पैसे देता का?, लक्ष्मीपूजनाला राज ठाकरेंच्या मोदी-शहांवर निशाना

raj thackeray on modi shah

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर दिवाळी रॉकेटप्रमाणे निशाना साधला आहे.

राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे देश चालवण्यासाठी ‘लक्ष्मीदेवीकडे’ पैसे मागताना या व्यंगचित्रात दाखवण्यात आल आहे. आपल्याकडे लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीदेवीची पूजा करून धन-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते,  मत्र राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात खुद्द लक्ष्मी देवीच मोदी आणि शहांकडे देश चालवण्यासाठी पैसे मागताना दिसत आहेत