राज ठाकरे-शरद पवार भेट; तब्बल 2 तास झाली गहन चर्चा

blank

मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. राज यांनी नुकतीच पवार यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आहे. ही भेट राजकीयच असल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत सामावून घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या वाट्याच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात. हीच शक्यता दृष्टीक्षेपात ठेऊन ईशान्य मुंबई या लोकसभा जागेसाठी राज ठाकरे यांनी ही भेट घेतली असल्याची माहिती आहे.