ठरल तर मग. .  ठाण्यात या ठिकाणी होणार राज ठाकरेंची जंगी सभा

mns

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 18  नोव्हेंबरला होणाऱ्या ठाण्यातील सभेची जागा निश्चिती अखेर झाली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन मार्गावर ही  सभा होणार आहे.

अनधिकृत फेरीवाल्यां विरोधात मनसेकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनानंतर ही सभा घेतली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमक काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान मनसेकडून रेल्वे स्थानक परिसरात सभेची तयारी करण्यात येत होती. मात्र या ठिकाणी सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आज ठाणे पोलिसांसह मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या जागेची पाहणी केली आहे.