#पुलवामा हल्ला : ‘मला वाटतं जे घडायचं होतं, ते घडलं, जायचे ते लोक गेले’

blank

औरंगाबाद : ‘पुलवामा हल्ल्यात जे शहीद झाले, त्यांचं दुर्दैव’ जायचे ते लोक गेले. नवं सरकार स्थापन झालं,’ असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. यावेळी त्यांना पुलवामा हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्या हल्ल्याबद्दल आज काय वाटतं?, असा प्रश्न राज यांना पत्रकारांनी विचारला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ काय बोलणार त्याच्यावर आता? जे शहीद झाले त्यांचं दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. तसे काही पुरावे समोर आले होते. जवानांना त्या मार्गानं घेऊन जाऊ नका, अशा सूचना असतानाही तरीही त्याच रस्त्यानं नेण्यात आलं होतं. त्याबद्दल मी प्रश्न विचारले होते,’ ‘मला वाटतं जे घडायचं होतं, ते घडलं. जायचे ते लोक गेले. नवीन सरकार बसलं. सगळ्या गोष्टी घडल्या,’ अशा शब्दांत राज यांनी पुलवामातील हल्ल्यावर भाष्य केलं.

दरम्यान या हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एकर स्ट्राइक केला. पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे बॉम्ब जंगलात पडले. त्यामुळे दहशतवादी मेलेच नाहीत, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. एअर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या मृत्यूबाबतही त्यांनी थेट शंका उपस्थित केली होती. कुठलंही लष्कर हे माहितीच्या आधारावर कारवाई करतं. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केला. पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे बॉम्ब जंगलात पडले. त्यामुळे दहशतवादी मेलेच नाहीत, असं राज यांनी म्हटलं होतं.