fbpx

राज ठाकरेंच्या सभेचा फायदा भाजपलाच, मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

raj fadanvis

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार न देता मोदी – शहा यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं घोषित केले आहे. शनिवारी मुंबईमध्ये विराट मेळावा घेत त्यांनी नरेंद्र मोदींवर घणाघात देखील केला, मात्र राज ठाकरेंनी कितीही सभा घेतल्या, तरी त्यांचा फायदा हा भाजप – शिवसेनेलाच होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी कितीही सभा घेतल्या, तरी त्यांच्या सोबत असणारा दोन चार टक्के मतदार देखील मागे राहणार नाही. त्याच्यासोबत गेलेले लोक हे मनाने हिंदुत्ववादी आहेत, ते जेवढ भाजप – सेने विरोधात बोलतील तेवढा त्यांचा मतदार आमच्याकडे येईल, राज ठाकरेंच्या सभा म्हणजे मान न मान मै तेरा मेहमान असल्याचं, फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे हे अशाप्रकारे वागण्याने आपला टीआरपी कमी करत आहेत, ते जेवढी मोदी विरोधी भूमिका घेतील, तेवढ त्यांच्या पक्षात सगळे मोदी समर्थक आम्हाला मतदान करतील, या निवडणुकीनंतर कदाचित कॉंग्रेस – राष्ट्रवादीने मला फसवल असं राज ठाकरे म्हणतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.