उद्योगपतींच्या मिठ्या चालतात मग राहुल गांधींची का नाही ? – राज ठाकरे

raj-thackeray

टीम महाराष्ट्र देशा : जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना, उद्योगपतींना मिठ्या मारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना, राहुल गांधींच्या मिठीचा स्वीकार उमदेपणाने करायला काय हरकत होती ?, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविश्वास ठरवा दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारलेल्या मिठी बद्दल भाष्य केलं आहे.

मोदी सरकार विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत मतदान झालं. यामध्ये कायम एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे सत्ताधारी आणि विरोधक आपण कायम पाहतो. मात्र, सभागृहात आपल्या भाषणातून सरकारचे वाभाडे काढल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली.

या भेटीवर उलट सुलट चर्चा रंगल्या असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच लक्ष केलं आहे.