राज ठाकरेंनी केले मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक, म्हणाले…

blank

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भला माणूस आहे. राज्याने गिनेचुने चांगले मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्यापैकी एक म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहता येईल, अशी स्तुतिसुमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उधळली आहेत. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांना मुख्यमंत्री फडणवीसांबाबत विचारले असता राज ठाकरे यांनी फडणवीसांचे कौतुक केले.

राज ठाकरे म्हणाले की, राज्याने गिनेचुने चांगले मुख्यमंत्री पाहिले. त्यापैकी एक म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहता येईल. पण, लोकं भरभरून मतं देताहेत, मग कामं करा ना. सध्या लोकांच्या अपेक्षेएवढी कामं होताना दिसत नाहीत. सरकारने विश्वास, दिलासा, हमी दिली पाहिजे. नरेंद्र मोदींबद्दल माझं मत होतं, आजही आहे. ज्या गोष्टींसाठी सत्ता दिली, त्या राबवायला काय जातंय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानसभा निवडणुकीत हटके भूमिका घेतली आहे. राज्याला आता प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे मला विधी बाकावर बसवा असे आवाहन त्यांनी केले आहे. लोकसभे प्रमाणे विधानसभेतही राज ठाकरे यांच्या सभा गाजत आहेत. या साभांधून राज ठाकरे सरकारचा चांगलाचं समाचार घेत आहेत. मात्र आता चक्क राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या