मुंबईत बुलेट ट्रेनची एक वीट रचू देणार नाही; राज ठाकरेंनी दंड थोपटले

राज ठाकरे

सरकारला कोणतीही गंभीरता राहिलेली नाही. त्यामुळे रेल्वेच्या विविध प्रश्नावर 5 तारखेला चर्चगेट रेल्वे स्टेशनवर मोर्चा काढणार असून त्यात स्वत सहभागी होणार असल्याच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितल आहे. तसेच बुलेट ट्रेन करायची तर गुजरातला करा मात्र मुंबईत बुलेट ट्रेनची एक वीट रचू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे

Loading...

काल एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांना आपला जिव गमवावा लागला आहे. याच संदर्भात आज पत्रकार परिषद घेवून राज यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘रेल्वे स्टेशनच नाव बदलून परिस्थिती बदलत नाही. देशात सध्या किड्यामुंग्यासारखी लोक मरत आहेत. कालची घटना कॉंग्रेसच्या काळात झाली असती तर भाजपनं काय केलं असतं?’ असा सवाल राज यांनी केला आहे.

दरम्यान माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची पाठराखण करत राज ठाकरे यांनी प्रभू हे चांगल काम करत होते मात्र बुलेट ट्रेनच्या लाडापायी प्रभूंना हटवलं आणि गोयलना आणल असा आरोप त्यांनी केला आहे.

 Loading…


Loading…

Loading...