आणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना ‘अशी’ वाहिली आदरांजली

मुंबई – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर स्मृतीस्थळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह देश- विदेशातील अनेक नेते, मान्यवर उपस्थित होते.

वाजपेयी यांच्या निधनानंतर जगभरातून विविध नेत्यांनी आपले शोकसंदेश पाठवले आहेत. भारतातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका चित्रामधून वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

देशाने आज एक महापुरुष गमावला – अण्णा हजारे