अरे बेटा नरेंद्र! राज ठाकरेंच्या कुंचल्यातून नरेंद्र मोदींना फटकारे

raj thackeray fb cartoon

टीम महराष्ट्र देशा: देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून कॉंग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर अन्याय केल्याची टीका वारंवार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येते. दोन दिवसांपूवी लोकसभेत बोलताना ‘ कॉंग्रेसने सरदार पटेल यांना डावलून जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान केल्याची’ टीका त्यांनी केली होती. याच विधानांचा धागा पकडत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या कुंचल्यातून मोदींवर चांगलेच फटकारले आहे.

Loading...

राज ठाकरे यांच्या कार्टूनमध्ये चक्क महात्मा गांधी अवतरले असून त्यांच्या हातामध्ये भारताचा इतिहास हे, माघे जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल बसले असल्याच दाखवण्यात आल आहे. यामध्ये महात्मा गांधी हे नरेंद्र मोदींना उद्देशून बोलत असल्याच दाखवण्यात आल आहे.

यामध्ये ते म्हणतात ‘अरे बेटा नरेंद्र, तुला जरा दोन गोष्ठी सांगायच्या आहेत! जवाहरलालना पंतप्रधान मी केल! कॉंग्रेसने नाही ! यावर काही बोलायचंय ? आणि दुसर म्हणजे वल्लभभाई जरी देशाचे गृहमंत्री होते तरी ते ‘कॉंग्रेसचेच’ नेते होते ना? मग तुला त्यांचा पुतळा उभारावासा वाटला! पण तू जिथून आलास त्या हेगडेवारांचा किव्हा गोळवलकरांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला ? प्रचारक होतास ना तू?

raj thackeray fb cartoon

काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी
काँग्रेसने सरदार पटेल यांच्यावर अन्याय केला. सरदार पटेल पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्नच निर्माण झाला नसता आणि संपूर्ण काश्मीर आज भारताचाच भाग असता, देशातील लोकशाही ही काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरुंची देणगी असल्याचे काँग्रेसचे नेते म्हणतात पण हाच तुमचा इतिहासाचा अभ्यास आहे का? असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला चांगलेच फटकारले होते.Loading…


Loading…

Loading...