लोकासांगे ब्रह्मज्ञान; भाजपच्या ‘हिटलरशाही’वर राज ठाकरेंचे फटकारे

टीम महाराष्ट्र देशा: १९७५ मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर मागील दोन दिवसांपासून भाजप नेत्यांकडून निशाना साधला जात आहे. आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हिटलर वृत्तीच्या असल्याची टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेवर फटकारे मारले आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्यंगचित्र पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे वेगवेगळ्या संस्थांची गळचेपी करत असल्याच दाखवण्यात आल आहे. राज यांच्या व्यंगचित्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दाखवण्यात आल आहे. तर मोदी हे आपल्या पायाने ‘रिझर्व बँक, उद्योगपती, मिडिया, निवडणूक आयोग’ यांना पायाखाली दाबत असल्याच दाखवण्यात आल आहे.

You might also like
Comments
Loading...