जळगाव : ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल उत्तर सभा घेतली. अलीकडेच गुढी पाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी शिवसेना-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर काल १० दिवसांत पुन्हा एकदा मनसेची जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये राज ठाकरेंनी जयंत पाटलांवर चांगलाच निशाणा धरला आहे.
“हे कधी म्हणे गेले होते उत्तर प्रदेश मध्ये? त्यांना आता उत्तर प्रदेश मध्ये गेल्याचे कौतुक वाटतं”. अशी टीका जयंत पाटील यांनी राज ठाकरेंवर केली होती. या टीकेला राज ठाकरेंनी चांगलेच प्रत्युतर दिले आहे. म्हणाले, जंत पाटील माझं भाषण निट ऐका मी म्हंटल ज्या बातम्या कानावर येत आहेत त्यानुसार उत्तर प्रदेश मध्ये विकास झाला असेल तर त्याचा मला आनंद आहे. माझी भाषा काय आहे जर तर ची भाषा आहे. असे बोलत जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख करत राज ठाकरेंनी टीका केली. याला चांगलेच प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले आहे म्हणाले, ‘राज ठाकरे यांना पुन्हा व्याकरण शिकवण्याची गरज आहे’.
महत्वाच्या बातम्या –