आज शांततेत आलोय पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही: राज ठाकरे

वेबटीम: येत्या पंधरा दिवसांत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजवरील फेरीवाल्यांना हटवल नाही, तर सोळाव्या दिवशी मनसैनिक त्यांना हटवतील असा सज्जड इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात काढण्यात आलेल्या ‘संताप मोर्चात’ ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका केली आहे. देशाततील नागरिकांनी मोदीं सरकारला बहुमताने निवडून दिल, मात्र आज त्यांनी घराघरात जाऊन बघितल तर लोक त्यांना शिव्या घालत आहेत हे समजेल, तसेच विश्वास टाकलेल्या माणसाने विश्वासघात केला तर जास्त राग येतो म्हणत राज यांनी मोदींवर हल्ला केला.

राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने आज ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढत राज ठाकरे यांनी आपलं निवेदन रेल्वे प्रशासनाला दिले आहे. पुढे बोलताना राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध कायम असल्याचे सांगितलं. तर माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुलेट ट्रेनला विरोध केल्याने त्यांना रेल्वेमंत्रीपदावरुन हटवल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. तसेच आधी आपणच बुलेट ट्रेनला विरोध केला. त्यांतर सगळे पोपट बोलायला लागल्याच राज म्हणाले. दरम्यान आजचा मोर्चा हा शांततेत काढला असून सुधारणा न झाल्यास पुढील मोर्चा आमच्या पद्धतीने काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

 Loading…
Loading...