राज ठाकरे यांनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट

raj thackrey

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील महापालिका निवडणुकांची रणनीती आखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून स्वतः पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात विशेष लक्ष घातले असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या राज ठाकरे २ दिवसीय पुणे दौर्यावर आहेत.

राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आज भेट घेतली. ठाकरे आणि पुरंदरे यांच्यामध्ये कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. याआधीही राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेण्यासाठी नेहमीच विशेष वेळ काढला आहे. राज ठाकरे हे नेहमीच पुरंदरे यांच्या प्रकृतीची चौकशी करत असतात. याआधी बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती.

दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या काही वर्षात पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उमेद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP