मार खाणारे नको, तर मार देणारे कार्यकर्ते मनसेला हवे-राज ठाकरे

नाशिक महापालिकेतील पराभवानंतर राज ठाकरे प्रथमच नाशिक दौऱ्यावर

टीम महाराष्ट्र देशा – मार खाणारे नको, तर मार देणारे कार्यकर्ते मनसेला हवे असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आदेश दिले. नाशिक महापालिकेतील पराभवानंतर राज ठाकरे यांनी शुक्रवारी प्रथमच नाशिकचा दौरा केला.यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणी घेऊन येऊ नये, उलट चोपल्यामुळे इतरांनी तुमच्याबद्दल तक्रारी करायला हव्यात, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

bagdure

काय म्हणाले राज ठाकरे ?
“गेल्या काही वर्षांत मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्याने खचून न जाता प्रत्येकाने नव्या जोमाने काम करणे आवश्यक आहे. मनसेची ताकद विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये नसून रस्त्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या येतात म्हणून चमकोगिरीसाठी आंदोलने करू नयेत. सोशल मीडियावर नाहक वेळ वाया घालवू नये. राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर अभ्यास करून आंदोलने करावीत, अशा कानपिचक्याही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.मार खाणारे नको, तर मार देणारे कार्यकर्ते मनसेला हवे असून मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणी घेऊन येऊ नये, उलट चोपल्यामुळे इतरांनी तुमच्याबद्दल तक्रारी करायला हव्यात.”

You might also like
Comments
Loading...