Raj Thackeray : पुण्यात आज ‘राज’गर्जना; ; ‘या’ टीकेचा घेणार का समाचार?

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे राज ठाकरे यांची सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेपूर्वी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत प्रचंड टीका केली आहे. आता या टीकेचा समाचार राज ठाकरे घेणार का, याकडे सर्वांच्या नजर असतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचा उल्लेख ‘मुन्नाभाई’ म्हणून केला होता. तसेच अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण यांनीही राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. पाडवा मेळाव्यात सर्वप्रथम मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका घेतल्यानंतर त्यांनी पुढचे पाउल औरंगाबाद सभेत घेतले होते. आता आजच्या सभेत या सर्व मुद्द्यांवर राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान पोलिसांनी सभेला परवानगी दिली असली तरी सभेसाठी काही अटी-शर्थीही ठेवण्यात आल्या आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या: