राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा नियोजनानुसारच, माध्यमांतील बातम्या चुकीच्या : बाळा नांदगावकर

टीम महाराष्ट्र देशा – राज ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा अर्धवट सोडलेला नाही. काही माध्यमांनी चुकीच्या आणि अपूर्ण माहितीच्या आधारे चुकीच्या बातम्या दिल्या आहे. राज ठाकरेंच्या सोबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकी नियोजित होत्या त्या झालेल्या आहेत. असा खुलासा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुक वर व्हीडीओद्वारे केला आहे.

माध्यमांत ज्या बैठकांबद्दल बोललं जात आहे , तशा कुठल्याही बैठका ठरल्या नव्हत्या. यासंदर्भात आलेल्या बातम्या खोट्या आहेत. अश्या खोट्या बातम्या देत जाऊ नका. तसेच अधिकृत व्यक्तीकडून माहिती घेऊनच बातमी द्यावी अशी विनंती करतो असेही नांदगावकर म्हणाले.

तसेच या चुकीच्या बातम्यांमुळे आमच्या पक्षाबद्दल आणि आमच्या नेत्याबद्दल संभ्रम निर्माण होतो. आमचा दौरा नियोजनानुसार सुरु असून काही कार्यक्रमांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. उद्या दुपारी किवा संध्याकाळपर्यंत आमच्या बैठका होतील आणि परवा सकाळी राज ठाकरे मुंबईला जातील अशी माहिती नांदगावकर यांनी दिली आहे.

विनंती

मा. राज साहेबांच्या संभाजीनगर दौऱ्या बाबत कुठलीही अधिकृत माहिती न घेता काही वृत्त वाहिन्या चुकीच्या बातम्या प्रसारित करत आहेत त्यांचा साठी माझी एक कळकळीची विनंती !आपला नम्रबाळा नांदगावकर🙏🏻🙏🏻🙏🏻

Bala Nandgaonkar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 14, 2020

 

राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा –

राज ठाकरे काल संध्याकाळी औरंगाबादला पोहोचले. ते १६ फेब्रुवारीला मुंबईला परतणार असल्याचं  सांगण्यात आलं आहे. त्यानुसार त्यांचे कार्यक्रम ठरलेले आहेत. मात्र राज यांनी मराठवाडा दौरा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राज ठाकरे उद्या सकाळीच मुंबईत परतणार आहेत अश्या बातम्या माध्यमांत आल्या होत्या.

राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मानस बोलून दाखवला आहे.

औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता? तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का? त्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत.