लोकांना त्रास होईल असं काही करू नका, राज ठाकरेंच्या सूचनेनंतर ठाणे बंद मागे

raj thakare

टीम महाराष्ट्र देशा : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. २२ ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता. परंतु आता मनसेनं ठाणे बंदचं आवाहन मागे घेतलं आहे. मनसे अध्यक्ष राज यांनी लोकांना त्रास होईल असे काही करू नका, असे सांगितल्यामुळे त्यांच्या आदेशानुसार आम्ही बंद पाठी घेत आहोत.

त्यांना चौकशीची नोटीस पाठविल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता आणि त्या तीव्र भावनेने आम्ही सरकार विरोधी ठाणे बंदचा इशारा दिला होता. पण त्या दिवशी आम्ही काय करणार आहोत याचा निर्णय मात्र आदल्या दिवशी घेतला जाईल. आज मात्र आम्ही बंद पाठी घेत आहोत, असे अविनाश जाधव यांनी सांगितले. त्यामुळे २२ ऑगस्टला होणारे ठाणे बंद आंदोलन आता होणार नाही.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला होता. तसेच विरोधी पक्षांना एकत्रीत करून ईव्हीएम विरोधात जनआंदोलन छेडले आहे. मोदी, शाह यांच्या हुकुमशाही विरोधात ठाम पणे उभे राहिल्यामुळेचं राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या