मुंबई:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल २२ मे रोजी पुण्यात जाहीर सभा झाली. यावेळी भाषणापूर्वीच राज ठाकरेंच्या कृतज्ञ मनाचा साक्षात्कार झाला. राज ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी दृष्टिहीन विद्यार्थी उपस्थित होते. त्यांची दखल घेत त्यांना आदराने व्यासपीठावर बोलावण्यात आले. यातून राज ठाकरेंचे एक वेगळे रूप सर्वांना पाहायला मिळाले. यावरूनच मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले आहे.
“पुण्यातील सभेसाठी अंध बांधव आल्याचे समजल्यावर, त्यांना व्यासपीठावर बोलावून नेत्यांच्या खुर्चीवर स्थान देण्यात आले. हेच तर खर ‘माणूसपण’ जगाच्या पाठीवर असं माणूसपण निभावणारा एकमेव राजकारणी म्हणजे राज ठाकरे”, असे ट्वीट अविनाश जाधव यांनी केले आहे.
पुण्यातील सभेसाठी अंध बांधव आल्याच समजल्यावर, त्यांना व्यासपीठावर बोलावून नेत्यांच्या खुर्चीवर स्थान देण्यात आले.. हेच तर खर ‘माणूसपण’..
जगाच्या पाठीवर अस माणूसपण निभावणारा एकमेव राजकारणी म्हणजे “आदरणीय राजसाहेब ठाकरे..”
— avinash jadhav (@avinash_mns) May 22, 2022
नेमके राज ठाकरे काय म्हणाले?
यावेळी राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जोरदार प्रहार केला. तसेच नवनीत राणा आणि रवी राणा, संदीप देशपांडे यांच्यावरील कारवाई अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी काल भाषण केले. यानंतर लगेच राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो. जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत. आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीसाठी तिथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं.ते तिथून झालं. पण महाराष्ट्रात रेल्वे भरती होती याच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात कुठेही नाही. पण त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारच्या वर्तमानपत्रात येत होत्या. तिथल्या रेल्वेभरतीमध्ये तिथल्या मुलांना नोकऱ्या मिळायला हव्यात. महाराष्ट्रातल्या भरतीमध्ये इथल्या मुलांना नोकऱ्या मिळायला हव्यात. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यानंतर स्थानिक भाषांमध्ये परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. हे त्या आंदोलनाचं यश आहे. असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला.
मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोलनाक्याच्या आंदोलनानंतर ७० टोलनाके महाराष्ट्रातले बंद झाले. बाकीच्या पक्षांची काहीच जबाबदारी नाही का? मुंबईत बॉलिवुडमध्ये पाकिस्तानी कलाकार येत होते. या देशातून हाकलून दिलं त्यांना. कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे? जेव्हा रझा अकादमीच्या लोकांनी मोर्चा काढला आणि पोलीस भगिनींना घोळका करून त्यांच्या अब्रूवर हात घालण्यात आला. बाहेरचे मुसलमान तिथे आले होते. त्याच्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. बाकी कुणी नाही काढला. कोणतं हिंदुत्व बोलताय तुम्ही? उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगावी की तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? भूमिकाच कुठली घ्यायची नाही. असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पक्षनिष्ठा नसलेल्या व्यक्तीला भाजपात ठेवणे कितपत योग्य आहे?; ‘काँग्रेस’चा सवाल
- IPL 2022 SRH vs PBKS : पंजाबचा हैदराबादवर सोपा विजय; लिव्हिंगस्टोनची वादळी खेळी!
- IPL 2022 SRH vs PBKS : हरप्रीतनं हैदराबादला रोखलं..! पंजाबसमोर शेवट ‘गोड’ करण्यासाठी १५८ धावांचं लक्ष्य
- IPL 2022 : ओ तेरी..! आमिर खान CSKसाठी खेळणार? म्हणाला, “मी जर चांगला खेळलो, तर…”
- IND vs ENG 2022 : इंग्लंडविरुध्दच्या पुनर्नियोजित एका कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा; वाचा!