आजच्या महाराष्ट्र दिनी राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. त्यातच फडणवीस यांनी आजच्या सभेतून महाविकास आघाडीला बूस्टर डोस देऊ, असा इशारा दिला आहे. मात्र याच इशाऱ्याला आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिल आहे. बूस्टर डोसमुळे तर संजीवनी मिळते असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी दिलेल्या जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली.
तसेच राज ठाकरे हे केवळ माध्यम दूत आहेत. त्यांची परिणामकारकता कुठेही दिसली नाही अशी खोचक टीका देखील त्यांनी राज ठाकरेंवर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –